बीड : परळीची जनता ही फार हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचे व कोणाची पतंग कधी काटायची ? हे याना चांगलेच माहीत आहे. मला विरोधकांवर टिका करायची नाही. कारण त्यासाठी मला माझी पातळी खाली करावी लागेलं आणि मी माझी पातळी खाली करनार नाही. असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. त्या परळी येथे आयोजित दीपावली निमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रमात बोलत होत्या.
सातारा जिल्ह्यात डॉ. अतुल भोसले यांची सहकाराची ताकद आजी आणि माजी सहकार मंत्र्यांचे भवितव्य ठरवणार
परळी नगरीत काँग्रेसचे राजकारण होते, त्यावेळी परळीत देशमुखांचे राजकारण होते. या परळी मतदार संघात अनेक लोकांनी नेतृत्व केलं, अनेकांनी योगदान दिले आहे. या परळीच्या जडणघडणीत खूप लोकांचा वाटा आहे, परळीच्या राजकारणातील ती पिढी कुठे आहे? आणि आत्ता काय राजकारण सुरू आहे ? मला राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंबद्दल टीका करायची नाही, कारण मला त्याच्या एवढं खालच्या पातळीला जाऊन काम करताच येणार नाही, म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मी काम करणारी आहे, मी कामाबद्धल बोलणार आहे, जनतेला सांगायचे आहे, की तुमचा नेता थकला नाही, हुकला नाही, मी तुमच्या सोबत आहे. माझा फाटका कार्यकर्ता देखील प्रामाणिकपने लढणार आहे, ही वानरसेना माझ्या सोबत आहे. असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंच्या टिकेला प्रतिउत्तर दिलंय.
पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, समुद्र मंथनाच्या वेळी विष पेण्याचे काम या महादेवांनी केले आणि परळी ही महादेवाची नगरी आहे. अनेक लढाया बाकी आहेत, आणि या लढाया मी लढणार आहे. दहा पाच लोक आहेत ज्यांना बील मिळालेत, मात्र शेतकरी, मजूर, सामान्य जनता यांना अद्याप काहीच मिळाले नाही, त्यामुळं ते वेळ आल्यास आपल्या मताची ताकद दाखविणार आहेत.
Read Also :
- ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांची लढाई नाही, ही लढाई समाजाला न्याय देण्याची – आशिष शेलार
- काँग्रेसने मित्र पक्षापासून सावध राहावे; नाना पटोलेंच्या मनात राष्ट्रवादीबद्दल सल?
- अरे शहाण्या तू आमदार आहेस; मास्कवरुन अजितदादांच्या रोहित पवारांना भर सभेत कानपिचक्या
- संघ आणि भाजपला सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
- भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल; कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, आलिशान गाड्याही जप्त