सांगली : शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठवड्यात 7 नोव्हेंबरला झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा तर, माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांच्याही आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
मोर्चाला परवानगी नव्हती, आंदोलकांवर कठोर कारवाई करणार – दिलीप वळसे पाटील
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानासाठी ठराव करण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. यासाठी जादाची पोलिस कुमत तैनात करण्यात आली आहे. एलसीबीचे विशेष पथक आटपाडीत तळ ठोकून असून कार्यकर्त्यांच्या हालचालींवर विशेष पथकाची करडी नजर असेल, असे एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सांगितल.
पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको – सुजय विखे पाटील
दरम्यान, याप्रकरणी अद्याप संशयितांचा शोध सुरूच आहे. व्हिडिओ शूटिंग, तसेच फोटोंच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचून गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत मोटारीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या होत्या. याबाबत दहा जणांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम राबवत छापेमारी सुरू केली असून गेल्या दोन दिवसांत पंधरा ठिकाणी कारवाया केल्या असून काल (ता.13 नोव्हेंबर) वाहने जप्त करण्यात आली आहे.
Read Also :
- गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा; गृहमंत्री वळसे पाटलांकडून पोलिसांचे भरभरून कौतूक
- उद्धव ठाकरे पैसे मोजतात असं मी बोललो नाही; ‘त्या’ वक्तव्यावरून किरीट सोमय्यांचा धुमजाव
- रझा अकादमीवर बंदी घाला, नाहीतर आम्ही त्यांना संपवू; नितेश राणेंची थेट धमकी
- जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले
- अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे; अमरावतीच्या हिंसाचारावर अजित पवारांची सुचक प्रतिक्रीया