मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यात काल अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाला हिंसक वळण मिळालं. तिनही शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आज भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. या बंदवेळीही हिंसक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरु असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.
एसटी आंदोलनात आता अण्णा हजारेंची उडी; पाठींबा देत म्हणाले, सरकार पडू शकतं असं वाटल्याशिवाय…
त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केलाय. या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.
त्रिपुरातील घटनेची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही; हिंसक आंदोलनावरून प्रविण दरेकर आक्रमक
पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर आहे. भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले. त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी.
Read Also :
- अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे; अमरावतीच्या हिंसाचारावर अजित पवारांची सुचक प्रतिक्रीया
- पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको – सुजय विखे पाटील
- मोर्चाला परवानगी नव्हती, आंदोलकांवर कठोर कारवाई करणार – दिलीप वळसे पाटील
- त्रिपुरात असं काही घडलंच नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र; अमरावतीतील हिंसाचारावर फडणवीसांचा संताप
- अमरावतीत 144 कलम लागू; आंदोलकांनी टपरी जाळली, दंगानियंत्रक पथके तैनात