बुलढाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील एच.एन. रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशावेळी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली होती. मात्र, त्यानंतर सोमय्यांना आपण केलेल्या त्या वक्तव्यावर उपरती झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थनाही केली.
त्रिपुरातील घटनेची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही; हिंसक आंदोलनावरून प्रविण दरेकर आक्रमक
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजण्यात व्यस्त होते. तर बायकोचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. अनिल परब यांच्या बांधकामात व्यस्त होते, अशा अनेक कामात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त होते, अशी खोचक टीका सोमय्या यांनी केलीय. ठाकरे सरकारने लुटीच्या साम्राज्याची स्थिती उभी केलीय. तर अजित पावरांचे मेहुणे आणि मामाला ईडीचे निमंत्रण आलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
अमरावतीत 144 कलम लागू; आंदोलकांनी टपरी जाळली, दंगानियंत्रक पथके तैनात
येत्या 31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारमधील 40 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. तर अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत त्यांचे मामा आणि मेहुणे यांना ईडीचे निमंत्रण आले आहे. येत्या 31 डिसेंबर पर्यंत ठाकरे सरकार मधील 40 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प आमचा आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.
त्रिपुरात असं काही घडलंच नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र; अमरावतीतील हिंसाचारावर फडणवीसांचा संताप
किरीट सोमय्या यांनी बुलडाण्यात बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यानंतर संध्याकाळी पत्रकारांनी सोमय्या यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांवर आपण कुठलीही टीका केली नाही. उलट मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करतो. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, असं सोमय्या म्हणाले.
Read Also :
- रझा अकादमीवर बंदी घाला, नाहीतर आम्ही त्यांना संपवू; नितेश राणेंची थेट धमकी
- जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले
- अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे; अमरावतीच्या हिंसाचारावर अजित पवारांची सुचक प्रतिक्रीया
- पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको – सुजय विखे पाटील
- मोर्चाला परवानगी नव्हती, आंदोलकांवर कठोर कारवाई करणार – दिलीप वळसे पाटील