अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप व्यतिरिक्तही अनेक राजकीय पक्ष हिंदूंचे असून, त्या पक्षांत हिंदू आहेत. आरएसएस-भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाला मतदान करा, असे आवाहन करीत संविधानाशी प्रामाणिक असलेला पक्ष सत्तेवर असायला हवा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते ओबीसी महासंघातर्फे पार पडलेल्या मेळाव्यात बैठकीत बोलत होते.
पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको – सुजय विखे पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदार, १८ अलुतेदारांच्या हातात तलवार देवून त्यांना त्याकाळात व्यवस्थेत सहभागी करून घेतले. मात्र, त्यानंतरच्या काळात ओबीसींचा केवळ वापर करण्यात आला. आता संविधान बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आरएसएस-भाजपच्या नादाला लागू नका, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे; अमरावतीच्या हिंसाचारावर अजित पवारांची सुचक प्रतिक्रीया
तर मतदानाच्या दिवशी शबाब, कबाब आणि पैसे या पासून दूर राहून मतदान करा, कारण मतदान झालं की, कुणी शबाब देणार नाही. असेही आंबेडकर म्हणाले. देशाचा स्वतंत्र दिवस हा काळा दिवस म्हणून संघाने पाळला. तर पाकिस्तानचा स्वतंत्र दिन हा साजरा केलाय. अशी टीका आंबेडकर यांनी केलीय. ओबीसी मेळाव्याला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते.
Read Also :
- भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल; कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, आलिशान गाड्याही जप्त
- गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा; गृहमंत्री वळसे पाटलांकडून पोलिसांचे भरभरून कौतूक
- उद्धव ठाकरे पैसे मोजतात असं मी बोललो नाही; ‘त्या’ वक्तव्यावरून किरीट सोमय्यांचा धुमजाव
- रझा अकादमीवर बंदी घाला, नाहीतर आम्ही त्यांना संपवू; नितेश राणेंची थेट धमकी
- जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले