बारामती : काल कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या तू आमदार आहेस. तूच मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् लोक मास्क वापरत नाही. हे बरोबर नाही’ असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जर तिसरी लाट आली तर त्याची मोठी किम्मत मोजावी लागेल. त्यामुळे टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा दिला अजित पवार यांनी दिला आहे.
अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे; अमरावतीच्या हिंसाचारावर अजित पवारांची सुचक प्रतिक्रीया
बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी करोनाबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. काल कर्जत जामखेडमधील कार्यक्रमाचं उदाहरण देताना त्यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्याचवेळी सर्वांनी दोन डोस घेण्याचं आवाहन करत लसीकरण मोठ्या प्रमाणात करा अशा सुचनाही प्रशासनाला दिल्या. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन डोस असतील तरच कोणतंही काम मार्गी लागेल अशी भूमिका घेतली. असा टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका असाही इशारा दिला आहे. आता तुम्ही म्हणाल काही होत नाही. करोना गेला आहे. पण करोना परत आल्याचंही समजणार नाही. त्यामुळं सावधगिरी बाळगा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले
अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाराला 50 हजारांचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं देणं देता आलं नाही. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. त्याचवेळी अशा संकट काळातही केंद्राकडून जीएसटीची रक्कम येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
Read Also :
- संघ आणि भाजपला सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
- भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल; कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, आलिशान गाड्याही जप्त
- गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा; गृहमंत्री वळसे पाटलांकडून पोलिसांचे भरभरून कौतूक
- उद्धव ठाकरे पैसे मोजतात असं मी बोललो नाही; ‘त्या’ वक्तव्यावरून किरीट सोमय्यांचा धुमजाव
- रझा अकादमीवर बंदी घाला, नाहीतर आम्ही त्यांना संपवू; नितेश राणेंची थेट धमकी