सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेला गोंधळानं सुरुवात झाली आहे. पालकमंत्री परस्पर जिल्हा नियोजनचा निधी आपल्या पक्षाच्या सदस्यांना देतात असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला. यावरून पालकमंत्री उदय सामंत आणि राणे कुटुंबामध्ये जोरदार फटकारे उडाले. यावेळी या बैठीकाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
समीर वानखेडे पुन्हा रडारवर; नवाब मलिकांनी उघड केलं ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट
जिल्हा नियोजन समितीची सभा ओरोस येथे सुरु असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजनचे अध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर नियोजनचा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना परस्पर देण्यात येत असल्याचा आरोप केला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
पेट्रोल-डिझेलची किंमत अमेरिका ठरवते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा जावईशोध
राणेंनी पेपरमध्ये आलेली बातमीचा पुरावा देत हा आरोप केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उदय सामंत यांनी सेनेच्या सदस्यांना गप्प राहण्याचे आवाहन केलं. मात्र, नियोजनाचा निधी कुठे ही परस्पर नियोजन समितीच्या सभेस शिवाय दिला जात नसल्याच सांगितले. पेपरमधील बातमी ही शिवसेनेच्या मेळाव्यात बोललो तेव्हाची होती. असा उल्लेख मी कुठे केला नसल्याचं उदय सामंत यांनी सांगत वादावर पडदा टाकण्याच काम केलं.
Read Also :
- “बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”
- ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक
- केंद्र सरकारने झाकीर नाईकचा फास आवळला, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षासाठी बंदी
- “अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा