पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी विरोधकांना पत्र पाठवून निवडणुक बिनविरोध होण्याची भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. काल चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत कसबा पेठ विधानसभेतून पोटनिवडणुकीसाठी पाच इच्छुक उमेदवारांची यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठवली आहे. तसेच निवडणुक बिनविरोध होण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना पत्र पाठवणार आहोत. असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागी आता पोटनिवडणुक जाहीर झाली असून येत्या फेब्रुवारीमध्ये त्यासाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह, मनसे, आप आणि इतर घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजप या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात. यासाठी प्रयत्न करीत आहेत.
“50 गद्दार मांडीवर बसवल्यानंतर भाजपला आमची गरज उरली नाही”, भाजपचा ‘हिरा’ ठाकरे गटात
काल झालेल्या भाजपच्या बैठकीत पाच उमेदवारांची नाव केंद्रीय निवडणुक समितीकडे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक आणि कुणाल टिळक यांच्या नावाचा समावेश आहे. तर त्याचबरोबर हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांची नाव पाठविली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अद्याप तरी कुणाचं नाव पाठवण्यात आलेलं नाही.
“राज्याच्या राजकारणात 2 प्लस 2, चार कधीच होणार नाही, ते मायनसमध्ये जातील”; मुख्यमंत्र्यांचा पलटवार
कसबा पेठ आणि चिंचवड मध्ये उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. कसब्यात काॅंग्रेस आणि शिवसेना तर चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवर दावा सांगण्यात येत आहे. पुण्यातील तिन्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उमेवादीवर दावा सांगत आहेत. मात्र दोन्ही मतदार संघात उमेदवारी कुणाला देण्यात यावी, यावर निर्णय अद्यापही झालेला नाही.
Read also
- “कोश्यारींच्या जागी, सुमित्रा महाजन की अमरिंदरसिंग ?,; येत्या 15 दिवसात राज्याचा राज्यपाल ठरणार”
- “आयुष्य अन् समाज घाण घडवणे हा भाजपचा एकच कार्यक्रम”, रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “भाजपने सर्वात जास्त हल्ले शरद पवारांवर केलेत”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
- “मोदी साहेब..! NDTV ला अडाणींनी विकत घेतंल, आता BBC ला कोण विकत घेईल?” राष्ट्रवादीने डिवचलं
- थोरातांचा पाठिंबा नेमका कुणाला ? शुंभागी पाटील कि सत्यजीत तांबे?