पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि प्रवक्त्या रूपाली पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात एका गाण्यावर डान्स केल्याने त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यावरून त्यांच्यावर राजकीय नेत्यांकडून टिका टिप्पणी केली जात आहे. यातच भाजपचे नेते प्रवीण अलई यांनी रूपाली पाटील यांच्यावर या प्रकारावरून खोचक टोला हाणला असून रूपाली पाटील यांना पक्षांनी आवरा म्हटलं आहे. त्यावर आता रूपाली पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“राज्याच्या राजकारणात 2 प्लस 2, चार कधीच होणार नाही, ते मायनसमध्ये जातील”; मुख्यमंत्र्यांचा पलटवार
रूपाली पाटील यांच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थित झालेल्या सर्व महिला मिळून रूपाली पाटील यांच्यासहित महिलांनी एका गाण्यावर डान्स केला. हे सर्व प्रकार कार्यालयातच घडल्याने त्यांच्यावर टिका करण्यात आली. अरे काय हा डान्स, राजकीय पक्षाच्या महिला भगिनींना हे अशोभनीय आहे, की पक्षाचा अजेंडा, हे रोहित पवार यांनी लक्ष्य दिलं पाहिजे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यक्रम बाकी सगळं चाललंय. असा खोचक टोला प्रवीण अलई यांनी रूपाली पाटलांना हाणला.
शुभांगी पाटीलसाठी राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना मैदानात, विजय आपलाच होणार..!
त्यानंतर रूपाली पाटलांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या प्रवीण अलई इसमाच्या बापाचे काय गेले, कार्यक्रम संपल्यावर महिला मनोरंजनासाठी डान्स केला. तर स्वत: घाण विचाराचा पक्ष म्हणून समाजात घाण करणारे म्हणून इतर महिलांची बदनामी करायला अधिकार नाही बे. भाजपची लोक विकृत लायकी नेहमीच दाखवतात म्हणे. असं म्हणत त्यांनी त्यांचा समाचार घेतला.
“ज्यांच्या नावाने राज्य चालवताय, त्यांचं दर्शन घ्यायाला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही”
दरम्यान, पुढे अजून त्या म्हणाल्या की, हाच कोण हरामी भिकारी विचारांच्या हे आमचे ऑफिस आमच्या मालकीचे आहे. आमचा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यावर आम्ही कोणत्या गाण्यावर डान्स करायचा हे आमचे स्वातंत्र्य आहे. तुझ्या सारख्या विचारांच्या लोकांमुळे महिला सुरक्षित, स्वांतत्र नाही. आयुष्य, समाज घाण घडवणे एकच भाजपचा कार्यक्रम आहे. असंही त्या म्हणाल्या.
हाच कोण हरामी
भिकार विचारांच्या हे आमचे ऑफिस आमच्या मालकीचे आहे आमचा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यावर आम्ही कोणत्या गाण्यावर डान्स करायचा हे आमचे स्वातंत्र्य आहे.
तुझ्या सारख्या विचारांच्या लोकांमुळे महिला सुरक्षित,स्वातंत्र्य नाही
आयुष्य,समाज घाण घडवणे एकच कार्यक्रम भाजपचा pic.twitter.com/tA8wDK5zTm— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 27, 2023
Read also
- “भाजपने सर्वात जास्त हल्ले शरद पवारांवर केलेत”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
- “मोदी साहेब..! NDTV ला अडाणींनी विकत घेतंल, आता BBC ला कोण विकत घेईल?” राष्ट्रवादीने डिवचलं
- थोरातांचा पाठिंबा नेमका कुणाला ? शुंभागी पाटील कि सत्यजीत तांबे?
- “बरं झालं शिवसेनेतून गद्दार गेले, अन् आम्हाला हिरा सापडला”; उद्धव ठाकरेंचं हिरेंच्या प्रवेशावेळी उद्गार
- “50 गद्दार मांडीवर बसवल्यानंतर भाजपला आमची गरज उरली नाही”, भाजपचा ‘हिरा’ ठाकरे गटात