नाशिक : राज्यात ताकद महाविकास आघाडीची असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडणूक आणण्यासाठी एकजुटीने काम करावे. शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी छगन भुजबळ यांनी नाशिक येथे सांगितले. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुक महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
“ज्या बापाला आपण बाप मानलाय, त्याबद्दल कुणी असे बोलले तर मी विरोध करेन”
पदवीधर मतदासंघात पहिल्या महिल्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांचा विजय पक्का असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तो पर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहील अशी भूमिका छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली.
“राज्यातील सर्व मातृशक्ती महेश दादाच्या पाठीमागे उभी”; ‘इंद्रायणी थडी’त चित्रा वाघ यांचं वक्तव्य
पदवीधर निवडणूक ही आगामी निवडणुकांमधील महाविकास आघाडीचा पाया असून सर्व पदवीधर मतदारानी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन भुजबळांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी तयारीला लागावे. आपली एकजूट टिकून ठेवत आघाडी अधिक मजबूत करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत शिंदे-भाजपचा धुव्वा उडणार…! सर्व्हे काय म्हणतो? आघाडीला 34 तर..
उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे ही पक्ष विरोधी घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे. त्यामुळे जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे मतदारांनी किती विश्वास ठेवावा? यावेळी उमेदवार शुभांगी पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, दत्ता गायकवाड, प्रेरणा बलकवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Read also
- “ज्यांच्या नावाने राज्य चालवताय, त्यांचं दर्शन घ्यायाला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही”
- अखेर सत्यजीत तांबेंना भाजपकडून पाठिंबा..! एका रात्रीत सगळं चित्र बदलणार…?
- राज्यातील नारीशक्तीची ताकद महेश लांडगे यांच्या पाठिशी : चित्रा वाघ – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘‘इंद्रायणी थडी’’ ला भेट
- “शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीचे प्रमुख स्तंभ, आदर ठेऊन बोला”,राऊतांनी आंबेडकरांना सुनावलं
- “सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे कुठेच दिसत नाही…!” लोकांची पसंती नेमकी कुणाला?