ठाणे : शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघे यांची आज जयंतीनिमित्ताने शिवसैनिक ठाण्यात येत आहेत. शिंदे गटातील नेत्यांच्या अगोदर ठाण्यातील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला ठाकरे गटातील नेत्यांनी अभिवादन केलं आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते राजन साळवी देखील आले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यावरून कडाडून टिका केलीय.
“राज्यातील सर्व मातृशक्ती महेश दादाच्या पाठीमागे उभी”; ‘इंद्रायणी थडी’त चित्रा वाघ यांचं वक्तव्य
ठाण्यात आनंद दिघे यांचं वलय फार मोठं राहिलं आहे. त्यांच्यामुळेच ठाण्यातील एकाद्या सामान्य माणसाला, आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर होता आलं. तसेच दिघे साहेबांनी ठाण्यातील लोकांसाठी असंख्य उपकार केले आहेत. त्यांनी आमच्यावर केलेल्या संस्कारीची पंरपरा, तसेच त्यांनी सुरू केलेले अनेक उत्सव आम्ही आजही चालू ठेवले आहेत. असं राजन साळवी यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शिंदे-भाजपचा धुव्वा उडणार…! सर्व्हे काय म्हणतो? आघाडीला 34 तर..
पुढे बोलतांना ते म्हणाले की, दिघे साहेब हे कडवट होते. या ठाण्यात शिवसेनेला गद्दारीचा शिक्का लागला होता. त्यावेळी दिघे साहेबांनी गद्दारांना क्षमा नाही. म्हणून ठाण्यात टाळा लागला होता. त्यावेळी 39 नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. असे असंख्य कडवट शिवसैनिक दिघे साहेबांनी करून ठेवले आहे. त्यामुळे या शिवसेनेला कोणी फोडू शकत नाही. पहिली सत्ता ह्या ठाण्यानी शिवसेनेला दिली आहे. तसेच अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यासाठी योगदान दिलं आहे.
“तांबेंच्या अपक्ष उमेदवारीमुळें काॅंग्रसेकडून धक्क्यावर धक्के, कार्यकारीणीच बरखास्त”
दरम्यान, सध्या महाराष्ट्रावर ज्या लोकांनी विश्वासघात केला आहे. तो विश्वासघात येथील जनता खपवून घेणार नाही. तसेच येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखविलीशिवाय राहणार नाही. तसेच ज्यांच्या नावाने राज्य चालवतात. त्यांचं दर्शन घेण्यासाठी अजून त्यांना वेळ मिळाला नाही. अगोदर आम्ही शक्तीस्थळावर गेलो. त्यानंतर आनंद आश्रमावर गेलो. चांगलं काम करण्यासाठी आम्ही पुढं जात आहोत. असंही त्यांनी म्हटलंय.
Read also
- अखेर सत्यजीत तांबेंना भाजपकडून पाठिंबा..! एका रात्रीत सगळं चित्र बदलणार…?
- राज्यातील नारीशक्तीची ताकद महेश लांडगे यांच्या पाठिशी : चित्रा वाघ – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘‘इंद्रायणी थडी’’ ला भेट
- “शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीचे प्रमुख स्तंभ, आदर ठेऊन बोला”,राऊतांनी आंबेडकरांना सुनावलं
- “सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे कुठेच दिसत नाही…!” लोकांची पसंती नेमकी कुणाला?
- “ज्या बापाला आपण बाप मानलाय, त्याबद्दल कुणी असे बोलले तर मी विरोध करेन”