मुंबई : राज्यपाल पदापासून मुक्त करा अशी मागणी केल्यानंतर महाराष्ट्रात आता राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोदींना अशी विनंती केली होती. महाराष्ट्राच्या राज्यपालांसाठी शद्या अनेक नावं चर्चेत आली आहेत. त्यावर येत्या 15 दिवसात शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे.
“50 गद्दार मांडीवर बसवल्यानंतर भाजपला आमची गरज उरली नाही”, भाजपचा ‘हिरा’ ठाकरे गटात
राज्यातील भाजपच्या नेत्यांशी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे चांगले संबंध राहिले आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या भाजपच्या प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मध्यप्रदेशातील असल्या तरी मराठी आहेत आणि त्यांचे माहेर मुंबई आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. सुमित्रा महाजन यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी नियुक्त झाल्या तर कुणालाचं आश्चर्य वाटणार नाही.
“राज्याच्या राजकारणात 2 प्लस 2, चार कधीच होणार नाही, ते मायनसमध्ये जातील”; मुख्यमंत्र्यांचा पलटवार
त्यानंतर काॅंग्रेसपासून दुरावलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचंही नाव चर्चेत आहे. काॅंग्रेसमधून त्यांनी फारकत घेऊन त्यांनी आता भाजपशी बस्तान बांधलं आहे. त्यामुळे त्यांचं राजकीय पुर्नरवसन भाजप यामधून करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा निवडणुका दीड -दोन वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे भाजप परिवारातील व्यक्तीची आणि त्यातही महाराष्ट्राची माहिती असलेल्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून भाजपकडून संधी दिली जाऊ शकते.
शुभांगी पाटीलसाठी राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना मैदानात, विजय आपलाच होणार..!
यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 75 सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक 31 जानेवारीच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या आठवड्याच्या अखेरीस बोलावली हे. या बैठकीत मोठ्या फेरबदलापूर्वी ही विद्यमान मंत्रिमंडळाची अखेरची बैठक असू शकते. अशी साऊथ ब्लॉकमध्ये चर्चा आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांत नवीन राज्यपाल व उपराज्यपालांच्या नियुक्त्या व भाजपमधील बदल एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.
Read also
- “आयुष्य अन् समाज घाण घडवणे हा भाजपचा एकच कार्यक्रम”, रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “भाजपने सर्वात जास्त हल्ले शरद पवारांवर केलेत”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
- “मोदी साहेब..! NDTV ला अडाणींनी विकत घेतंल, आता BBC ला कोण विकत घेईल?” राष्ट्रवादीने डिवचलं
- थोरातांचा पाठिंबा नेमका कुणाला ? शुंभागी पाटील कि सत्यजीत तांबे?
- “बरं झालं शिवसेनेतून गद्दार गेले, अन् आम्हाला हिरा सापडला”; उद्धव ठाकरेंचं हिरेंच्या प्रवेशावेळी उद्गार