मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द ठरवले. यानंतर मराठा समाजाकडून राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. विरोधकांनी देखील, “हे आघाडी सरकार आरक्षण टिकवण्यात न्यायालयात कमी पडले,” असे सांगत, सरकारवर टीकेची झोड उठवली. यात राज्यातील अनेक मराठा नेत्यांनी आता राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी बोलतना, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी, राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात आता भाजपचे कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
“मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील, त्यात पक्षीय ओळख बाजूला भाजपदेखील सहभागी होणार आहे. महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचा उद्रेक दडपशाही करून दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप हा डाव हाणून पाडेल, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.
Read Also :
- “…तर उजनीसाठी रक्तही सांडू”, शिवसेना आमदाराची शिवगर्जना
- “पुन्हा एकदा तोडले का अकलेचे तारे”; उमा खापरेंची, रुपाली चाकणकरांवर टीका
- “रेमेडीसीवर घोटाळ्यात अडकलेत मोठे मासे…”; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र
- मराठा आरक्षणाच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – महेश लांडगे
- “देशात व्हेंटीलेटर्स आणि मोदी दोन्हीही बिनकामाचे”