मुंबई : “घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेऊन केंद्र सरकारने जगात लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनेतला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल. केंद्र सरकारच्या पापाचे फळ सामान्य जनतेला भोगावे लागत आहे”, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.
घरात नाही दाणा पण मला "वॅक्सिन गुरू" म्हणा…
भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल.#vaccine @PMOIndia pic.twitter.com/60FTKjJUCU— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
त्यांच्या या टीकेचा आता भाजपकडून समाचार घेण्यात आला असून, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी थेट रुपाली चाकणकर यांच्यावर शाब्दिक टीकेची झोड उठवली आहे.
“रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा तोडले का अकलेचे तारे.. (रॉ मटेरियल) सगळा कच्चामाल बाहेर ज्या देशातून येतो, आपण त्याला सहकार्य केलं, म्हणून जगभरात न आपल्याला covid साठी ऑक्सिजन, औषधसाठी सर्वांची मदत मिळाली… मोदी है तो मुमकिन है… विचार करा ना जरा पुण्यचं आहे ना?”, अश्या शब्दात त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
@ChakankarSpeaks पुन्हा एकदा तोडले का अकलेचे तारे.. (रॉ मटेरियल) सगळा कच्चामाल बाहेर ज्या देशातून येतो, आपण त्याला सहकार्य केलं, म्हणून जगभरात न आपल्याला covid साठी ऑक्सिजन, औषधसाठी सर्वांची मदत मिळाली… मोदी है तो मुमकिन है… विचार करा ना जरा पुण्यचं आहे ना? @BJPMM4Maha https://t.co/TALNW7PCSh
— Uma Khapre (@KhapreU) May 17, 2021
Read Also :
- “रेमेडीसीवर घोटाळ्यात अडकलेत मोठे मासे…”; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र
- “देशात व्हेंटीलेटर्स आणि मोदी दोन्हीही बिनकामाचे”
- “भाजपविरोधात संपूर्ण देश एकजूट, आम्हीही पाहून घेऊ किती लोकांना अटक करताय”
- घरात नाही दाणा पण, मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…
- “साहेब काहीतरी करा, नाहीतर २०२४ मध्ये आपला पक्ष…”; कट्टर भाजप समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल