मुंबई – भाजपावाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. अशा शब्दात सामनामधून शिवसेनेने भाजपावर टीका केली. महाराष्ट्राच्या भाजपावाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपावाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे. अर्णब आसामी आहे.
शिवसेनेच्या या टीकेवर आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उत्तर दिले. “अवघी शिवसेना इटालियन काँग्रेसच्या मांडीवर खेळते आहे. राज्यसभेचे उमेदवार म्हणून शिवसेनेने किती सवतीची पोरं मांडीवर खेळवली?”
अतुल भातखळकर यांचे ट्विट –
अवघी शिवसेना इटालियन काँग्रेसच्या मांडीवर खेळते आहे. राज्यसभेचे उमेदवार म्हणून शिवसेनेने किती सवतीची पोर मांडी वर खेळवली? कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, अबू आजमी अशा हिंदुत्वद्रोह्यांना मांडीवर खेळवायचा नवा शौक शिवसेनेला जडला आहे.