मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला ऊत आला आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या खालोखाल भाजपचे क्रमांक दोनचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. शिवसेनेकडून सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
भाजपामधील नाराजांना राष्ट्रवादीचे ‘रेडकार्पेट’ अन् निष्ठावंतांच्या हातावर तुरी?
भाजपकडून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपने आमदार आशिष शेलार यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर २५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
मोठी बातमी: नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, राणेंना जामीन मिळणार?
भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार अँड. आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून माध्यम विभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्या खांद्यावर दिली आहे.
मुंबईत ट्रॅफिक जॅममुळे जोडप्यांचे घटस्फोट होतात – अमृता फडणवीस
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रशासन समन्वयपदी निवड करण्यात आली आहे. आचार्य पवन त्रिपाठी आणि आमदास विद्या ठाकूर यांच्याकडे विशेष संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली तर महिला संपर्क समितीची जबाबदारी शलाका साळवी, शीतल गंभीर यांच्याकडे आहे. संजय पांडे यांना प्रवाशी कार्यकर्ता समितीची जबाबदारी आहे. भाजप आमदार योगेश सागर हे जाहिरनामा समितीचे सचिव असतील. या समितीत भाजप नेते सुनिल राणे, आर.यू. सिंह, राजहंस सिंह, प्रभाकर शिंदे हे सदस्य आहेत.
Read also:
- म्हापसा मतदारसंघात जोशुआ यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित – नाईक
- मायकल लोबो वैफल्यग्रस्त झाल्यानेच भाजपच्या नेत्यावर टीका करत आहेत – उर्फान मुल्ला
- पुण्यातील निवडणूकची पहिली झलक: बॅनरबाजीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीत दाखल
- आधी गोळ्या घातल्या, नंतर कुऱ्हाडीचे वार; शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या