मुंबई : कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक अद्याप थांबताना दिसत नाही. कंगनाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर आता शिवसेनेने कंगनाला कचाट्यात पकडण्यासाठी व्हिव रचना सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. कंगना राणावतच्या कार्यालयाची मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. कंगनाने या कार्यालयात अनधिकृत बांधकाम तर केले नाही ना ? याची यावेळी अधिकर्त्यांकडून पाहणी करण्यात आली.
कंगना राणावतचं पालीहिल येथे कार्यालय आहे. नुकतंच हे कार्यालय बांधण्यात आलं आहे. पालिकेच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने या कार्यालयात जाऊन त्याची पाहणी केली. हे कार्यालय नियमाप्रमाणेच बांधलं आहे की नाही, याची शहानिशा करण्यात आली. कंगनाने तिच्या कार्यालयात अंतर्गत बदल केले का ? पालिकेच्या प्लाननुसारच हे बांधकाम झालंय का ? बांधकाम करताना एफएसआयचं उल्लंघन तर झालं नाही ना ? आदी गोष्टींची यावेळी पाहणी करण्यात आली.
तसेच तिच्या कार्यालयापासून ते रस्त्यापर्यंतची मोजणीही करण्यात आली. कार्यालयासाठी अधिकची जागा तर घेतली नाही ना यासाठी ही मोजणी करण्यात आली असल्याची माहिती आता समोर येत आहे.
कंगना बाबत फडणवीस म्हणतात
अभिनेत्री कंगना राणावत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपाने सुद्धा याचा निषेध केला आहे. तुम्ही भले कंगना रानावतच्या मताशी सहमत नसाल पण प्रत्येक नागरिकांची सुरक्षा करणं ही राज्याची जबाबदारी आहे असे मत आज देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे
Read Also
आगामी काळात कंगना विधानपरिषदेत किंवा राज्यसभेत दिसल्या तर नवल वाटायला नकोhttps://t.co/T67TW5wiAO@VijayWadettiwar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020