पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सचिव मोहसीन शेखसह शिवाजीराव जावीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक च्या नेतृत्वाखालील शहर सोशल मीडिया टीमने तक्रार केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या @NCPspeaks चा युवक सचिव मोहसीन शेख तसेच शिवाजीराव जाविर विरुद्ध पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भाजप पुणे शहराध्यक्ष @jagdishmulikbjp यांच्या नेतृत्वाखालील शहर सोशल मीडिया टीमने तक्रार केली होती. pic.twitter.com/GMf2sDWlyC
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 9, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॅार्फ करुन तो समाजमाध्यमावर प्रसिद्ध करुन घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्त्वाच्या लौकीकास बाधा आणणारे कृत्य जाणीवपूर्वक करुन त्यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा फोटो वापरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. शिवाजीराव जावीरने “चुडिया सस्ती कर दो बाजार में, हिजडे बैठे है यूपी और केंद्र सरकार में” अशा आशयाचा मजकूर टाकून नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना स्त्री वेशात दाखवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजपाचे सोशल मीडिया संयोजक विनीत वाजपेयी हे या प्रकरणातले मुख्य तक्रारदार आहेत.
Read Also :
- फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि…आमदार कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- दैनिक सामनामधून ममता बॅनर्जी यांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांशी तुलना
- महामारी, तिसरी आघाडी आणि काँग्रेसवर संजय राऊतांचे मोठे भाष्य, म्हणाले…
- ‘ही तर राज्य सरकारची त्रिसूत्री, एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती!’, भाजपकडून ठाकरे सरकारवर हल्लबोल