मुंबई : ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनची 86 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केंदीय रेल्वेमंत्री, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री मा. पियुषजी गोयल यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. यावेळी इसमाच्या सर्वात तरुण सदस्या व कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून साखर उद्योगाबाबत व निर्यात धोरणाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
केंद्राने जाहीर केलेल्या नवीन निर्यात धोरणामुळे देशातील कारखाने जास्तीत जास्त साखर निर्यात करतील व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देतील असा विश्वास कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी चालू असलेल्या साखर कारखानदारी बाबतीतील अडचणींवर चर्चा झाली तसेच केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व साखर उद्योगासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी वरती व चालू असलेल्या हंगाम परिस्थितीबाबतील शिफारसही ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या वतीने केंद्र सरकारला पाठविण्याबाबत चर्चा झाली.
Read Also :
“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…,” संजय राऊतांना खरमरीत पत्र
‘लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची’