मुंबई : संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा असल्याचे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा असून राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजपा आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो, असा आरोप सचिन सांवत यांनी केला होता. सोबतच, भाजप व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.
काँग्रेसच्या आरोपांबद्दल जराही आश्चर्य वाटले नाही कारण, संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे. ज्या ट्रस्टमध्ये महंत नृत्य गोपाल दास जी महाराज, स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज, स्वामी वासुदेवानंद सरस्वती जी महाराज, स्वामी विश्वप्रशसन्न तीर्थ जी महाराज यांच्यासारखे महान संत असतील, तर काँग्रेस त्यांच्यावर आरोप करणे कसे काय सोडू शकते, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.
राम जन्मभूमी ट्रस्टवर आरोप करण्यापूर्वी आधी तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांना एकदा हे नक्की विचारावं की त्यांनी 1.11 लाख रुपये राम मंदिरासाठी दिले आहेत की एखाद्या पक्षाला त्यांनी वर्गणी दिली आहे ? तुमचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही विचारावं की, 11 चांदीच्या विटा त्यांनी राम मंदिरासाठी दिल्या आहेत की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिले आहेत ? असा खोचक सवालही त्यांनी केला.
Read Also :
- ‘राहुल गांधी लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करत आहेत’, स्मृती इराणींचे जोरदार प्रत्युत्तर
- शेतकरी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
- महाविद्यालय सुरू करण्याच्या मुद्यावरून राज्यपाल-ठाकरे सरकार आमनेसामने?
- ‘काकां’मुळे सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय लागली – अजित पवार
- ‘मतांसाठी राजीव, इंदिरा गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने…’ राममंदिराच्या निधीवर भाजपचे प्रत्युत्तर