नाशिक : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाशिकमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम येत्या १ नोव्हेंबरला होणार आहे. या निमित्ताने भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी हा योग जुळवून आणला आहे.
गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांची धमकी
राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षणामुळे वातावरण तापले आहे. असे असताना हे दोन्ही ओबीसी नेते एकत्र येत असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र व देशपातळीवर ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बऱ्याच चर्चा झाल्या. यासाठी राज्यव्यापी आंदोलनही करण्यात आले.
मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे खळबळजन वक्तव्य
आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ओबीसीसाठी महत्त्वपूर्ण असलेले छगन भुजबळ तसेच ओबीसीसाठी नेहमीच झटणाऱ्या पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपाचे संपर्क नेते जयकुमार रावल तसेच अन्य काही मान्यवरदेखील आमंत्रित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नामको बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या नुतनीकरणाच्या कार्यक्रमालाही हे दोघे एकत्र येणार आहेत. अशात या दोन्ही नेत्यांकडून काय वक्तव्य केलं जाते याकडे लक्ष लागून आहे.
Read Also :
- अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, मन्नतवर दिवाळी; राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी थंडावणार?
- पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो; नवाब मलिकांचा पटलवार
- अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; दोन्ही सभापतीपदांवर महाविकास आघाडीचा विजय; भाजपचीही साथ
- गुन्हेगारीवरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय चिखलफेक; गुंडगिरीत सहभागाचा महापौरांचा आरोप
- एसटी चालकाची आत्महत्या; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा