मुंबई : आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचं उदघाटन होत असून, वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने आज पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भुयारी मार्गासह मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या वतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात उभारण्यात आलेल्या मेट्रो २ अ, तसेच मेट्रो ७ च्या चाचणी मार्गांचे उदघाटन करण्यात आले.
येत्या काळात या दोन्ही मार्गांवर मेट्रो धावणार असून, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धावणाऱ्या मेट्रोची चाचणी देखील आकुर्ली मेट्रो स्थानकावर पार पडली आहे. यावेळी मेट्रोच्या आकुर्ली स्थानकाला फुलांनी सुशोभित निर्णय आले होते. तसेच, स्थानकाच्या फलाटावर चाचणीसाठी मोठ्या दिमाखात मेट्रो उभी होती.
यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना, तसेच चाचणी होणाऱ्या या मेट्रोला पाहण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणीसाठीच्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आणि चाचणीसाठी मेट्रो धावू लागली.
First Ever Trial Run of the Metro Line 2A & 7 – LIVE https://t.co/ltdC6rZ20q
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2021
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हे देखील याठिकाणी उपास्थित होत्या. मात्र, या उदघाटनाला राज्याच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण देण्यात न आल्याने भाजपने याविरोधात निदर्शेन केली असून, त्यांनी यावर बहिष्कार घातला आहे.
Read Also :
- देवेंद्र फणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
- पिंपरी चिंचवडच्या उद्योगांना ऑक्सिजन द्या; अजित पवारांचे जिल्हा प्रशासनाला आदेश
- भाजपनेच ओबीसी समाजाचा मुडदा पाडला – नाना पटोले
- धनगर आरक्षणात काका-पुतण्याचा काळाबाजार – गोपीचंद पडळकर
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भाजपची प्रश्नांची सरबत्ती, विचारले ‘हे’ 6 प्रश्न