पुणे : ऊसतोड कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल , अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तर, मी अजून मुंबईच्या बाहेर कार्यक्रम घेण्यास सुरवात केली नाही, पण लवकरच धनंजय तू बीड मध्ये ऊसतोड कामगारांचा एखादा मेळावा लाव मी तिथं येऊन त्यांच्याशी संवाद साधतो. असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.
काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून २० वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.
विरोधकांचा डाव पंतप्रधान इम्रान खाननं उधळून लावला; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतीची घेतली भेट
ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या माताभगिनींच्या आरोग्याचेही अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठीदेखील विशेष लक्ष देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासनाने गेल्या दोन दिवसात महत्वाच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कृतीतून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन महामंडळाला त्यांचे नाव देण्यात आल्याचे सांगून गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांचाही उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला. ऊसतोड कामगारांशी स्वतः संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.
Read also:
- ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य; अजित पवार
- साहेबांच्या वारसदारांना संधी मिळाली पण..; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
- ” असंतुष्ट आत्मांच्या छाताडावर बसून महापालिका जिंकणार”; संजय राऊतांची भीष्मप्रतिज्ञा
- राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम
- मनसे भाजपची ‘सी’ टीम झाल्याचा आम्हाला आनंद; आदित्य ठाकरेंची मनसेवर खोचक टीका