नवी दिल्ली : एकीकडे रशिया-युक्रेन मध्ये घमासम युद्ध सुरू आहे. तर भारताच्या शेजारील पाकिस्तानात पंतप्रधानविरोधात आज अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यामुळे याची चर्चा भारतात एव्हाना साऱ्या जगात होती. कारण त्याठिकाणी अद्याही कोणत्याही पंतप्रधान पाच वर्ष पुर्ण केले नाही. त्यामुळे त्याकडे सगळ्याचे लक्ष लागून होतं. अशातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने अखेरच्या क्षणी मोठा डाव खेळला आहे.
भुजबळ, पिचड, अरूण गुजराथी हे कोणते नेते मग? राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या टिकेला पवारांचं प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात संसदेचे उपसभापती कासिम खान सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत न जाता थेट राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेतली. त्यानंतर पाकिस्तानची संसद विसर्जित कऱण्याची मागणी केली आणि ती मागणी राष्ट्रपती आऱिफ अल्वी यांनी लगेच मान्य केली. त्यामुळे विरोधकांनी रचलेला डाव खानने मोडून काढला.
राष्ट्रवादीमुळे जातीयवाद फोफावलाय; राज ठाकरेंचा शरद पवारांंवर निशाणा
त्यानंतर इम्रान खान यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, परकीय शक्तींकडून कट रचून सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र आता अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असून मी याबद्दल पाकिस्तानी जनतेचं अभिनंदन करतो. संसद विसर्जित करावी, असा सल्ला मी आधीच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील जनतेचे पुन्हा निवडणुकांची तयारी करावी असं त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाच्या बातम्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला तर..;
दरम्यान, त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की देशात पुढच्या 90 दिवसांत पुन्हा निवडणुका होतील. अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याची कृती संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाने केला आहे. हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने विरोधी पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read also:
- “काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली”; राज ठाकरेंच्या भाषणांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
- व्वा रं पठ्ठा…,काय बोलावं आता? अजित पवारांकडून खास दादा स्टाईलने राज ठाकरेंना प्रत्युत्तर
- “मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल, पण भाजपचं गांडूळ निघालं”;
- “इडी काय राष्ट्रवादीचा पिच्छा सोडत नाही”; शिवसेनेच्या नेत्याची तक्रार अन् राष्ट्रवादी नेत्याच्या घरी इडी
- पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला