सोेलापूर : राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांचा केंद्रीय तपास यंत्रणा पिच्छा काही सोडेना. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सतत इडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांची टांगती तलवार आहे.
भाजपला सांगलीत मोठा धक्का! भाजपच्या माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश
साखर कारखान्याततील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयात ईडीकडून त्यांची तीनवेळी चौकशी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आ्हे. त्यामुळे हे संपुर्ण प्रकरण 500 कोटींच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येत असून बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.
“गांधी, नेहरूंचा आदर सन्मान करण्याऐवजी, त्यांच्यावर टिका टिप्पणी केली जातेय”; शरद पवारांची खंत
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते बबनराव शिंदे यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांचा घामाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, असं संजय कोकाटे यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर वेळ प्रसंगी यासाठी उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात देखील आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन! अनेक नेते उपस्थित
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक देखील मनी लॉण्डिंग प्रकरणी अटकेत आहेत. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील इडीच्या कारवाईअंतर्गत तुरूंगात आहेत. त्यामुळे बबनराव शिंदे यांना देखील आता याप्रकरणावरून अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जर बबनराव शिंदे यांना अटक झाली तर हा राष्ट्रवादीला अजून एक मोठा धक्का मानला जात आहे.
Read also:
- पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला
- भुजबळ, पिचड, अरूण गुजराथी हे कोणते नेते मग? राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या टिकेला पवारांचं प्रत्युत्तर
- राष्ट्रवादीमुळे जातीयवाद फोफावलाय; राज ठाकरेंचा शरद पवारांंवर निशाणा
- “निवडणुकीनंतर सेना प्रमुखांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आठवलं, आधी झोपले होते का?”
- मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाच्या बातम्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला तर..;