सांगली : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्यातील महत्वाचे नेते कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते. त्या अगोदर जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी कार्यक्रमाची काल पाहणी केली होती. तर या कार्यक्रमाला काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, जयंत पाटीलांसह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.
काॅंग्रेसच्या नेत्यांनं आव्हांडासमोर बांधलं हाताला घड्याळ; अन् काॅंग्रेसच्या आमदारांनं काढला पळ
शिराळ्याचे भाजपचे माजी आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा शिराळा याठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश झाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील असणारे आरोग्य केंद्र ही मॉडेल आरोग्य केंद्र करायचं असं ठरवण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणखी भाजप नेत्यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष प्रवेश प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, भाजप सारखं पुढचं बोलायची आम्हाला सवय नाही. मात्र जसं जसं घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही नक्की देऊ, अशी माहिती देखील त्यांनी दिली होती.
पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात? “वेल कम टु कोरेगाव” म्हणत शिवसेना नेत्याचं आव्हान
त्याचवेळी, माणसाला राजकारण कुठं करायचे आणि समाजकारण व धर्मकारण कुठे करायचं, हे शहाणपण शिकलं पाहिजे, असा सल्ला माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या अहिल्यादेवी होळकर स्मारकावरच्या उद्घाटनावरून त्यांना लगावला होता.
साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? भाजपचा राज्य सरकारला सवाल
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरून टीका टिप्पणी केली जात आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी यावरून शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं होतं.
Read also:
- राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय का? आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर
- “भाजपमुळे देशात जनता रोज एप्रिल फुलमध्ये जगतेय” नाना पटोलेंची मिश्कील टीका
- काॅंग्रेसचे ते २५ आमदार दिल्लीत प्रशिक्षण घेणार; नाराज नसल्याचं काॅंग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं
- पंच प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद! वळसे पाटलांनी दिले चौकशी करण्याचे आदेश
- मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची चौफेर टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितला किस्सा