सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुरूवातीला मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल, अशा चर्चा राज्यात रंगू लागल्या होत्या. मात्र अशातच आता पार्थ पवार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स देखील कोरेगाव तालुक्यात लावण्यात आले आहेत. त्यामुळे पार्थ पवार हे आता कोरेगावच्या राजकारणात प्रवेश करणार का ?असा प्रश्न सध्या राजकारणात निर्माण झाला आहे.
देशाला ३४ वर्षानंतर मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण दिलं; विखे पाटलांकडून मोदींचं कौतुक
2019 मध्ये पार्थ पवारांनी मावळ लोकसभेतुन निवडणुक लढवली. मात्र त्याठिकाणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. पवार कुटुंबियांच्या इतिहासात पहिल्यांदा पार्थ पवार यांना पराभव पचवावा लागला. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार मवाळ मतदार संघातूनच निवडणुक लढवतील का? असा सवाल सर्वसामान्यांना पडला होता. त्याचबरोबर त्यांच्या चर्चा देखील रंगू लागल्या. मात्र आता कोरेगावाचा मुद्दा सध्या चांगलाचं गाजत आहे.
काळजी करू नका, सुधारणेला वाव असेल तर सुधारणा करू! वळसे पाटलांचा राऊतांना शब्द
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंचा पराभव झाल्यामुळे मतदार संघ राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या हातून तो शिवसेनेच्या ताब्यात गेला. त्याठिकाणी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी विजय मिळवत तो आपल्या ताब्यात घेतला.
राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी..; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा
दरम्यान, पार्थ पवार कोरेगावच्या राजकाऱणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेंवर महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांना त्यांनी वेलकम टू कोरेगाव असं म्हटलंय . त्याचबरोबर त्यांनी जरंडेश्वर कारखाना आम्ही पुन्हा परत मिळवला हे विसरू नका अंस सांगत त्यांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे.
Read also:
- साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? भाजपचा राज्य सरकारला सवाल
- सरकार पाडण्याच्या गुढ्या मनात उभारणाऱ्यांना चोख उत्तर; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
- तर चंद्रकांत पाटील ऑफर का घेऊन आले मग ? मुन्ना महाडिकांना जयश्री जाधवांचे तिखट उत्तर
- कोल्हापुरात भाजपचं वजन वाढलं; एसटी संघटना, हिंदू एकता आंदोलन समितीचा भाजपला पाठींबा
- मोठी बातमी ! आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईलंच निधन