मुंबई : आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेला प्रभाकर साईलचा काल ह्यदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. साईलचे वकिल तुषार खंदारे यांनी प्रभाकर साईलच्या निधनाची माहिती दिली. मुंबईतील चेंबुर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.
गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल, नाही तर तुमच्यासाठी रोज नवा खड्डा: संजय राऊत
गोव्याकडे मुंबईहुन जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर सापडलेल्या ड्रग्जमुळे आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणी कारवाई करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार म्हणून प्रभाकर साईल यांच्यासह काही जणांनी काम केलं होतं. मात्र प्रभाकर साईलचे वकिल तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी साईलचं निधन झालं आहे.
गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असणाऱ्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडण; म्हणाले..;
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी झालेल्या कारवाईतील साक्षीदार प्रभाकर साईल, मनिष भानुशाली आणि अन्य साक्षीदारांनी केलेल्या आरोपांची चौकशीही करण्यात आली होती. साक्षीदार प्रभाकर साईलचा जवाब नोंदवण्यात आला होता. प्रभाकर साईल यांनी एऩसीबीचे तत्कालीन विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा दणका! अनिल देशमुखांच्या संबंधित याचिका फेटाळली
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलचं तापलं दिसून आलं. यात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती.
Read also:
- देशाला ३४ वर्षानंतर मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण दिलं; विखे पाटलांकडून मोदींचं कौतुक
- काळजी करू नका, सुधारणेला वाव असेल तर सुधारणा करू! वळसे पाटलांचा राऊतांना शब्द
- राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी..; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- फडणवीसांकडे अहमदनगर, सोलापुरची जबाबदारी; रोहित पवारांचा शिंदे, विखेंना चिमटा
- मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! मुनगंटीवारांचा टोला