नवी दिल्ली : सध्या राज्यात महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांवर केंद्रिय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील तपास सीबीआयकडून काढून घेण्यात यावा, यासाठी राज्य सरकारने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने या निर्णयाने राज्य सरकारला परत एकदा जोरदार धक्का बसला आहे. त्याचबरोबर सीबीआय लवकरच अनिल देशमुख, मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी सचिन वाझे आणि कुंदन शिंदे यांचा ताबा घेणार आहे.
सध्या देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याशी संबंधित चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखालील समितीद्वारे करण्यात यावी, असं राज्य सरकारने विनंती केली होती. मात्र आम्ही या प्रकरणाला हातही लावणार नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सरकारची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुक! मतदानाच्या तोंडावरच चंद्रकांत पाटलांनी फोडला आघाडीचा ‘हा’ नेता
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना लाच घेतल्याप्रकरणी आणि मुंबईतील बारमालकांकडून वसुली केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. त्यामुळे त्यांना 2 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणी मुंबईचे तात्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते.
” नितेश राणे टायगर नव्हे तर ओरडणारा भालू “; सतीश सावंतांची राणेंवर जहरी टीका
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्यामुळेच अनिल देशमुख यांचा मतदार संघ सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष तयारी करत आहे. नागपुर येथील काटोल मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे महत्वाचे नेते त्याठिकाणी भेटी देऊन लोकांशी संवाद साधत आहे.
Read also:
- ऑनलाईन शिक्षणात हजारो अडथळ्यांमुळे अभ्यासावर लक्ष कसं केंद्रीत करावं? मोदींनी सांगितला जबरदस्त उपाय
- केंद्रीय अतिरेकी तपास यंत्रणांना घुसवलं जातंय; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
- “अनिल परब बरोबरच नंतर हसन मुश्रिफांचा नंबर”; किरीट सोमय्यांचा आघाडीला कडक इशारा
- इतिहास सांगतो, आमुच्या स्त्रीने शत्रू तुडवला! चित्रा वाघ धनंजय महाडिकांवर कडाडल्या
- ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यांवर माफी नाहीच; धनंजय महाडिकांची सारवासारव