मुंबई : मागील तीन ते चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटीचा कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही संपता संपेना झाला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ऐतिहासिक पगारवाढ केली तरी अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. कर्मचारी हे विलगीकरणाच्या मुद्द्यावरून संपावर आहेत. कोणत्याही परिस्तिथीमध्ये विलगीकरण घेणारच असा असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतल्याने आता सरकार अडचणीत आले आहे.
शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
याविषयी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यात येईल असं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलेलं असताना देखील कर्मचारी कामावर परत येण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. जर कर्मचाऱ्यांनी आता ऐकलं नाही तर आम्ही कठोर निर्णय घेऊ, असं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे.
हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
अजित पवारांसोबतच आता अनिल परब यांनी देखील कर्मचाऱ्यांना कडक शब्दात अंतिम मुदत दिली आहे. एसटी संपावरतोडगा निघत नसल्याने राज्य सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. २२ हजार कंत्राटी ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एसटीला पुन्हा राज्याच्या जनतेच्या सेवेला उतरविण्याची तयारी राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात आली आहे.
गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार
संपावर असलेल्यांपैकी जे आजपर्यंत कामावर परतलेले नाहीत त्यांना नोकरीची गरज नाही असे समजून त्यांच्यावर निलंबन, बडतर्फी आणि सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा निर्णय आता आम्ही लवकरात लवकर घेऊ असा स्पष्ट इशारा अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. जे उपलब्ध कर्मचारी आहेत, त्यांच्यासोबत कंत्राटावर कर्मचारी घेऊन एसटीची सेवा सुरू केली अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे.
Read also:
- कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुक! मतदानाच्या तोंडावरच चंद्रकांत पाटलांनी फोडला आघाडीचा ‘हा’ नेता
- ” नितेश राणे टायगर नव्हे तर ओरडणारा भालू “; सतीश सावंतांची राणेंवर जहरी टीका
- ३२ वर्ष उलटली, तरीही मुंबईत तसा मी बेघरच; शिवसेनेच्या माजी खासदाराची खंत
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती