कोल्हापूर : उत्तरेचे विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी येत्या 12 एप्रिलला मतदान होणार असून त्या निवडणुकीचा निकाल 16 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.
तुम्ही शिवसेना नाही, सावंतसेना वाढवण्याचा प्रयत्न करू नका; तानाजी सावंतला अंधळकरांनी धो धो धुतलं
कोल्हापुर उत्तरेची पोटनिवडणुक चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल गेल्या काही दिवसांपासून त्याठिकाणी ठाण मांडून बसले आहे. मतदान 12 एप्रिल रोजी होत असून त्याचा निकाल 16 एप्रिलला लागणार आहे. त्यासाठी महसुल विभागातील 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांसाठी आज त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. याचबरोबर मतदानदिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
आघाडीत शिवसेना पाठोपाठ काॅंग्रेसही नाराज; काॅंग्रेसचे 25 आमदार सोनिया गांधींची घेणार भेट
पोटनिवडणुकीसाठी काॅंग्रेसकडून जयश्री जाधव, सत्यजित कदम, भाजप, यशवंत कृष्णा शेळके, नॅशनल सोशालिस्ट पार्टी, विजय श्यामराव केसरकर, लोकराज्य जनता पार्टी, शाहिद शहाजान शेख ,वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांमध्ये सुभाष वैजू देसाई, बाजीराव सदाशिव नाईक, भारत ऊर्फ संभाजी भोसले. मनिषा मनोहर कांरडे, अरविंद भिवा माने, मुस्ताक अजीज मुल्ला, करूणा मुंडे, राजेश ऊर्फ बळवंत सत्याप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागाडे यांनी सहभाग घेतला आहे.
कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली
दरम्यान, आज सकाळीच राजारामपुरी ऑक्सिजन गार्डन येथे चाय पे चर्चा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेली घराणेशाही, विकासाचा नसलेला चेहरा, विकासाबद्दल नसलेली दूरदृष्टी, भाजप उमेदवार निवडून आल्यानंतर करण्यात येऊ शकणारी कामे याबद्दल सत्यजित कदम आणि धनंजय महाडिक यांनी जनतेला समजावून सांगितली आहेत. कोल्हापूर उत्तरेत भाजपकडून सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरु असल्याचे दिसून आले आहे. कदमांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवसाआड ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Read also:
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार
- राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
- ” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ