मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत युपीयचं अध्यक्षपद शरद पवारांकडे सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि तो समंत देखील झाला. यावरून देशातच एकच चर्चा सुरू झाली होती. शरद पवारांकडे युपीयचं अध्यक्ष पदाची चर्चा सुरू असताना देशात यावरून राजकीय वादंग उसळण्याची शक्यता आहे. अशातच आता यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आघाडीत शिवसेना पाठोपाठ काॅंग्रेसही नाराज; काॅंग्रेसचे 25 आमदार सोनिया गांधींची घेणार भेट
युपीयचं अध्यक्षपदावरून जयंत पाटलांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सगळ्या पक्षांनी बसुन निर्णय घेण्याचा विषय असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, युपीयचं काम काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व्यवस्थितपणे करत आहे. त्यामुळे युपीयच्या अध्यक्ष पदाचा निर्णय देशातील सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र बसून केल्यावर ठरेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस बाप आहे हे फार उशिरा कळले ? महापौर संदीप जोशींचे नानांना शाब्दिक टोले
काॅंग्रेस पक्षाचं अस्तित्व देशातील बऱ्याच राज्यात आहे, आणि ते आज ही काही राज्यांमध्ये आहे. काॅंग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे मला असं वाटतं की देशातील सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र बसून त्यावर विचार करत पुढील वाटचाल ठरवणे योग्य असेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुखांचा गढ राष्ट्रवादी राखणार; तनपुरे, मिटकरी, मुंडेंसह राष्ट्रवादीची फौज काटोल मतदारसंघात
दरम्यान, देशात नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी चांगलीच मुठ बांधली आहे. काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारताचा पुढचा पंतप्रधान कोणता नेता होणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार
- राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
- ” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
- तुम्ही शिवसेना नाही, सावंतसेना वाढवण्याचा प्रयत्न करू नका; तानाजी सावंतला अंधळकरांनी धो धो धुतलं