नागपूर : राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने ते सध्या तुरूंगात आहे. अशातच आता त्यांचा नागपुरमधील काटोल विधानसभा मतदार संघ कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने मेगा प्लॅन आखला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी अनेक बडे नेत्यांची फौज कटोलमध्ये जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.
उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा
राष्ट्रवादी काॅंग्रसचे प्राजक्त तनपुरे, अमोल मिटकरी आणि धनंजय मुंडे अनिल देशमुख यांचा मतदार संघ राखण्यासाठी जाणार आहे. कटोल मतदार संघात गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काॅंग्रसने वर्चस्व राखले आहेत. फक्त एकाच वेळी या मतदार संघातील निवडणुक राष्ट्रवादी काॅंग्रेस हरली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्यासह नवाब मलिक देखील तुरूंगात आहेत.
आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
अशातच आता अनिल देशमुख तुरूंगातुन बाहेर आल्यावर पुन्हा ते गृहमंत्री होतील, अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून राज्यात सुरू आहे. त्यामुळे काटोल मतदार संघ हा हातातून निसटून जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी प्राजक्त तनपुरे, अमोल मिटकरी, धनंजय मुंडे तसेच रोहित पवार देखील काटोल मतदार संघात जाणार आहे. काल अमोल मिटकरी देखील येऊन गेले आहेत. त्याचबरोबर प्राजक्त तनपुरे देखील येऊन गेले. दर आठवड्याला याठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते याठिकाणी येऊन अनिल देशमुख यांच्यावतीने ते पार पडणार आहेत.
मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा
दरम्यान, काटोल मतदार संघात अजूनही भाजपकडे भक्कम उमेदवार नाही आहे. त्याचबरोबर त्याच बाजूचा मतदार संघ हा काॅंग्रेसचा मतदार संघ असल्याने कटोल मतदारसंघात काॅंग्रेसला देखील रस असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याठिकाणी सुनिल केदार यांची ताकद हळूहळू ग्रामीण भागात वाढत आहे.
Read also:
- फडणवीसांना भावी मुख्यमंत्री म्हणत, भाजप आमदारांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
- एकट्या राहुला गांधीना दोष देणं शक्य नाही; पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे : सुशिल कुमार शिंदे
- कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली
- कोल्हापूरात प्रचाराचा जोर वाढला; उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचं पारडं जड
- आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा