कोल्हापूर : कोल्हापूर ऊत्तरेत भाजप आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद उतरवलेली दिसत आहे. जस जशी मतदानाची प्रक्रिया जवळ येत आहे तसं तशी कोल्हापूर उत्तरेत राजकीय जुगलबंदी आणखी रंगतदार होताना दिसत आहे. काहीही झाले तरी विजय आपलाच असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून पाहायला मिळत आहे.
हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल
महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपकडून धनंजय महाडिक यांचे नातेवाईक असणाऱ्या सत्यजित नाना कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यजित कदम यांच्यासाठी भाजपकडून जोरदार ताकद लावण्यात आली आहे आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर उत्तरेच्या उत्तरेश्र्वर पेठ येथे काल महिला भगिनींचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. धनंजय महाडिक यांनी मेळाव्याला संबोधित केले आणि सत्यजित कदमांना विजयी करण्याचे आवाहन देखील केले.
पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल
दुसरीकडे शाहपुरी मंडल याठिकाणी देखील भाजपकडून सत्यजित कदम यांच्याकरिता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्यजित कदम, धनंजय महाडिक, अमल महाडिक यांनी मेळाव्याला संबोधित केले. उपस्थित सर्व भाजपा कार्यकर्त्यांसमवेत यावेळी उत्तर मतदारसंघातील प्रचार नियोजनसंदर्भात चर्चा करण्यात आली.
खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर
भाजपच्या मेळाव्यांना चांगली गर्दी कोल्हापूर उत्तरेत पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जयश्री जाधव यांच्याकडून सहानुभूतीपूर्वक आवाहन लोकांना केले जात आहे. पंढरपूर-मंगळवेढ्याप्रमाणे कोल्हापूर उत्तरेतही भाजपचा डंका वाजणार का ? हे पाहणे आता औत्सुकतेचे ठरणार आहे.
Read also:
- आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा
- उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा
- आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
- मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा
- आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल