मुंबई : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेत शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचं काम केल्याने त्यांचं आडनाव आगलावे करा, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेत्यांनी सदाभाऊ खोतांवर जोरदार टीका केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना यावरून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचं काम केलं, त्यांचा आडनाव आगलावे करा: सदाभाऊ खोत
ते म्हणाले की, सदाभाऊ खोत यांची सध्या आमदारकी जात आहे. त्यामुळे त्यांचा आमदारकी टिकवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप कशा पद्धतीनं करीत आहे. हे सगळ्या जगाला माहिती आहे. काश्मिर फाईल्स च्या माध्यमातून दोन धर्मात कलह वाढवण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप देखील त्यांनी लावला आहे.
सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांचा तडफडेचा ‘हा’ आवाज! नाना पटोलेंची भाजपवर जहरी टिका
त्याचबरोबर सदाभाऊंची गत पाण्याविना मासोळी असं झालंय. पवार साहेबांनी काय केलं. यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? हे शोधणं महत्वाचं आहे. राज्यातील सर्व ऐतिहासिक पुतळ्याचं उद्धघाटनं पवार साहेबांनी केलं आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करून सदाभाऊ यांनी पाप केलंय. त्याचबरोबर तीन पक्षाचं सरकार आहे. भाजप एका पक्षाचं सरकार असतानाही कुजबुज होत होती. असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर उत्तरेत भाजपची प्रचार आघाडी; वाघाची तालीम सदस्यांचा भाजपला पाठींबा जाहीर
दरम्यान सोलापुर दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकरी मेळाव्या दरम्यान शरद पवारांना बद्दल वक्तव्य केलं. शरद पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचे काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आडनाव आता आगलावे करावे, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. ज्याठिकाणी जातील त्याठिकाणी फक्त आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचं इतकंच काम केलं आहे. असं म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे असं आवाहन देखील केलं आहे.
Read also:
- खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर
- आमचा एकच दणकट बसला तरी आईचं दुध आठवेल; सावंताचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
- ग्रामपंचायत सदस्य मुश्रिपांकडून 1, 2 कोटी मंजूर करून आणतो, ते सेनेच्या आमदार, खासदारांनाही मिळत नाही
- शिवसेनेतून अनंत गितेंना बाहेरचा रस्ता; शरद पवारांवर केलेली टीका भोवली
- ज्यांना कमी मिळालं त्यांची नाराजी दुर केली जाईल; सावंताच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा सुर