कोल्हापूर : उत्तरेचे विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतरही काही पक्षांनी कोल्हापूर उत्तरेत आता आपली ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे.
आमच्या मांडीला मांडी लावून बसले अन् आमची घडी..; सेनेच्या नेत्याचा काॅंग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा
कोल्हापूर उत्तरेत भाजपकडून सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरु असल्याचे दिसून आले आहे. कदमांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवसाआड ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावं लागलं; क्षीरसागरांचे राष्ट्रवादीवर धक्कादायक आरोप
आज सकाळीच राजारामपुरी ऑक्सिजन गार्डन येथे चाय पे चर्चा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेली घराणेशाही, विकासाचा नसलेला चेहरा, विकासाबद्दल नसलेली दूरदृष्टी, भाजप उमेदवार निवडून आल्यानंतर करण्यात येऊ शकणारी कामे याबद्दल सत्यजित कदम आणि धनंजय महाडिक यांनी जनतेला समजावून सांगितली आहेत.
अखेर मलिक बिनखात्याचे मंत्री ; राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे त्यांचा कारभार सोपवला
भाजपला जनतेमधूनच नाही तर इतरही काही संघटनांकडून पाठींबा मिळत आहे. काल उत्तरेशवर पेठ येथील वाघाची तालीम येथील सर्व सदस्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. शहराच्या प्रश्नांवर महापालिकेत सत्यजित कदम यांनी चांगला आवाज उठवला होता आणि आता ते आणखी चांगलं काम करू शकतात असं वाघाची तालीम सदस्यांनी म्हटलं आहे. सत्यजित कदम यांनी आगळ्या वेगळ्या प्रचाराने जोरदार सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटील,धनंजय महाडिक यांची त्यांना चांगली साथ असल्याने त्यांना फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे.
Read also:
- आमदार संदीप क्षीरसागरांची ‘झिंग कार्यपद्धती’ निष्क्रिय; क्षीरसागरांवर शिवसेनेची बोचरी टीका
- आमदारांना 300 घर बांधणार असल्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- महाराष्ट्राला वेठीस धरू नका; एक पाऊल तुम्ही पुढं या एक पाऊल आम्ही येतो: ऊर्जामंत्री नितीन राऊत
- आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
- मग का प्रकरणाला उकळी देण्याचं काम करता? अजित पवार जाधव प्रकरणावरून भडकले