बीड : बीडमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आता चांगलाच जोर धरू लागला आहे. काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील दरी आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मागच्या आठवड्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसंपर्क अभियानांतर्गत जोरदार भाषणे करून बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला होता.
बीडचा सातबारा या ऐऱ्या गैऱ्या नथू गैऱ्यांच्या नावावर आहे असा संतप्त सवाल जयदत्त क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागरांना विचारला होता. आता जयदत्त क्षीरसागरांनी पुन्हा एकदा पुतणे संदीप क्षीरसागर यांना धक्का देत आम्हीही काही कमी असा संदेश दिला आहे. बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरें, फारुक पटेल, अमर नाईकवाडे देखील आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आता आमदार झाल्यानंतर मिळणाऱ्या वागणुकीमुळे ते सुद्धा संदीप क्षीरसागरांवर नाराज असल्याने राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून आता हातात शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा होत आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आमदार संदीप क्षीरसागर यांची सध्याची काम करण्याची कार्यपद्धत वेगळी आहे. हे विकास कामे करण्याऐवजी काम अडवतात. पालकमंत्र्यांची तालुक्यात आणलेल्या विकास कामांचे श्रेय घेतात. पक्ष स्थापनेपासून आम्ही राष्ट्रवादीत होता. पंरतु आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावे लागत असल्याचंही जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. पोटाला दगड बांधून आम्ही संदीप यांना निवडून आणले होते. मात्र सध्याचे आमदार हे निष्क्रिय निघाले त्यामुळे आता आम्ही शिवसेनेते प्रवेश करत आहोत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच नेते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. पाचही समर्थक हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, नितीन लोढा व प्रेमचंद लोढा या पाच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. बीड शहरात या प्रवेशासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. बीड शहरात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली असून शिवसेनेने राष्ट्रवादीला डिवचले आहे. आज हा प्रवेश होणार असल्याने बीडमध्ये राजकीय वार चांगलंच फिरत आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हे पाच प्रवेश होणार आहेत.
Read also:
- अखेर मलिक बिनखात्याचे मंत्री ; राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे त्यांचा कारभार सोपवला
- “शरद पवार अन् रामराजे यांच्या पुढे हरलो नाही, माझा आंडू पांडूनी नाद करू नये”
- राज्य सरकारवर टीका करत पंकजा मुंडेंचा भाजपलाही घरचा आहेर; म्हणाल्या..;
- ” तुमच्या नाकर्तेपणाचा कारभार आयुक्तांवर थोपवू नका “; राष्ट्रवादीचा गिरीश बापटांवर हल्लाबोल
- पंतप्रधानांनीच चित्रपट बघण्याचं आव्हान केलं तर एकवाक्यता टिकणार कशी ? शरद पवार