मुंबई : महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेत यंशवंत जाधव यांच्या घरी अलिकडेच इडीने छापा टाकला. त्यांच्याकडून काही मालमत्ता इडीने जप्त केल्या आहेत. अशातच आता त्यांच्या डायरीत मातोश्री ला दोन कोटी रूपये आणि 50 लाख रूपयांचे घड्याळ दिल्याचं तपासाअंती इडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलं. याच दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशंवत जाधव यांनी इडीकडे केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनेते किरीट सोमय्यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे.
दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
यशंवत जाधव यांनी मातोश्री ला दोन कोटी रूपये आणि 50 लाख रूपयांचे घड्याळ दिल्याच्या चर्चा राज्यात जोर धरू लागल्या. यावरून हद्द कर दी.. यशवंत जाधवांनी घोटाळ्या लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे.. वाईट वाटते. 50 लाखाचे घड्याळ, 2 कोटी रोख, जाधवांनी पोचपाती, बिलही घेतले असेल, असं ट्विट किरीट सोमय्यांनी केलं आहे.
दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
या प्रकरणाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या डायरीच्या तपासअंती सगळं प्रकरण बाहेर यावं. त्यासाठी इडीने मातोश्रीची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल आणि अतुल भातखळकर यांनी केली आहे.
गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी; आमदार निलेश लंके, राणेंना धो धो धुतलं!
दरम्यान, या डायरीत कोणत्या मातोश्रींची नोंद आहे हे मला माहित नाही. परंतु आता चौकशीतुन कोणीही सुटू शकत नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले तरी केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also:
- आपण किती खरं बोलतो ते देवाच्या दरबारात तपासून घेतलं पाहिजे :संजय राऊत
- प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मोदींसह अमित शहा, फडणवीस सोहळ्याला उपस्थित
- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण; शिवसैनिकांवर गृहमंत्री कारवाई करणार का?
- बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष पेटला; क्षीरसागरांनी फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते
- मुंबै बॅंक निवडणुक प्रकरण: प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार