बीड : बीडमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आता चांगलाच जोर धरू लागला आहे. काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील दरी आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मागच्या आठवड्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसंपर्क अभियानांतर्गत जोरदार भाषणे करून बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला होता.
दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान
बीडचा सातबारा या ऐऱ्या गैऱ्या नथू गैऱ्यांच्या नावावर आहे असा संतप्त सवाल जयदत्त क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागरांना विचारला होता. आता जयदत्त क्षीरसागरांनी पुन्हा एकदा पुतणे संदीप क्षीरसागर यांना धक्का देत आम्हीही काही कमी असा संदेश दिला आहे.
नितेश,निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित; विनायक राऊतांची खरमरीत टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच नेते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. पाचही समर्थक हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, नितीन लोढा व प्रेमचंद लोढा या पाच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. बीड शहरात या प्रवेशासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. बीड शहरात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली असून शिवसेनेने राष्ट्रवादीला डिवचले आहे. आज हा प्रवेश होणार असल्याने बीडमध्ये राजकीय वार चांगलंच फिरत आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हे पाच प्रवेश होणार आहेत.
कुणाला कुदळ, फावडा घ्यायचंय ते घ्या, मर्द मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही
बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरें, फारुक पटेल, अमर नाईकवाडे देखील आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आता आमदार झाल्यानंतर मिळणाऱ्या वागणुकीमुळे ते सुद्धा संदीप क्षीरसागरांवर नाराज असल्याने राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून आता हातात शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा होत आहे.
Read also:
- मुंबै बॅंक निवडणुक प्रकरण: प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार
- दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
- गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी; आमदार निलेश लंके, राणेंना धो धो धुतलं!
- राजकारणात मंत्र्यांना बायको अडचणीत आणते, नाही तर चहापेक्षा किटली गरम: नितीन गडकरी
- बिचारे अमित शाह खंर बोलतात, त्यांचा आदर वाटतो: सुप्रिया सुळेंची लोकसभेत गुगली