मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या पाठीमागे किरीट सोमैया हे हात धुवून मागे लागले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांचे दोपोली येथील रिसॉर्ट तोडण्यासाठी भाजपनेते किरीट सोमय्या दोपोलित दाखल झाले आहेत. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलाचं तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांना रिसॉर्ट तोडून दाखवाच असा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकारण चिघळण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय कधीतरी भरून निघेल; खडसेंचा फडणवीसांवर रोष
दापोलीतील साई रिसॉर्ट माझे नाहीच त्यामुळे किरीट सोमय्या यांनी हे रिसॉर्ट तोडून दाखवावेच, असं आव्हान अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिलं आहे. किरीट सोमय्या नौटंगी करीत आहेत. त्यांच्याकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे झेंडे लावलेल्या १५० गाड्या आणि हातात भलामोठा एक हातोडा घेऊन किरीट सोमय्या हे दापोलीत ठाण मांडणार आहे.
सोमय्यांचा महाविकास आघाडीवर हातोडा; अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीत
अनिल परब पुढे म्हणाले की, साई रिसॉर्ट हे सर्व कायदेशीर परवानग्या घेऊनच बांधले होते. त्यामुळे हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे किंवा नाही हे ठरवणारे, किरीट सोमय्या कोण आहेत ? रिसॉर्ट बेकायदेशीर असेल तर कोर्टात कायदेशीर लढा दिला जाईल. ही देखईल कायदेशीर लढाईसाठी तयार आहे. मी कोर्टात यासंबंधी उत्तर देणार असल्याचंही अनिल परबांनी सांगितले.
जुन्नर बिबट सफारी प्रकल्प वाद : अजित पवारांनी पुन्हा ठणकावलं
दरम्यान, अनिल परब यांचा रिसॉर्ट हा बेकायदेशीर आहे. मी जो हातोडा घेऊन चाललो आहे हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, मला अटक करुन दाखवा असं खुलं आव्हान किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला केंद्राने सुरक्षा दिली आहे म्हणून मी वाचलो असं देखील किरीट सोमैया यांनी म्हटलं आहे.
Read also:
- नितेश,निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित; विनायक राऊतांची खरमरीत टीका
- कुणाला कुदळ, फावडा घ्यायचंय ते घ्या, मर्द मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही
- आयुष्य़ खुप कलाटण्या देतंय; हवं तर विजय चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- “वास्तविक पाहता मला राजकारणारपेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता”: देवेंद्र फडणवीस
- अजित पवारांची ‘ती’ खंत योग्यच; गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया