दापोली : मुंबई आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरु आहे. याचा परिणाम असा की भाजपचे काही नेते शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांना टार्गेट करत आहेत तर शिवसेनेचे काही नेते भाजपच्या आमदारांना, नेत्यांना टार्गेट करत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या पाठीमागे किरीट सोमैया हे हात धुवून मागे लागले आहेत.
सतेज पाटीलांसह त्यांच्या कुटुंबिंयाबाबत ईडीकडे तक्रार करणार; कोल्हापूर उत्तरेत राजकारण तापलं
परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथे असलेले साई रिसॉर्ट हे अनधिकृत आहे आणि त्यावर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमैया हे आज सकाळी दीडशे गाड्यांचा ताफा घेऊन दापोलीत धडकले आहेत. भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावलेल्या १५० गाड्या आणि हातात भलामोठा एक हातोडा घेऊन किरीट सोमैया हे दापोलीत ठाण मांडणार आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांना का वाचवत आहेत ? आणि पुरावे देऊनही परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई का केली जात नाही ? याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी सोमैया हे दापोलीत पोहोचले आहेत.
“ठाकरेंकडे शक्तिशाली टोमणा बॉम्ब”; फडणवीसांनी उडवली मुख्यमंत्री ठाकरेंची खिल्ली
अनिल परब यांचा रिसॉर्ट हा बेकायदेशीर आहे. मी जो हातोडा घेऊन चाललो आहे हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, मला अटक करुन दाखवा असं खुलं आव्हान किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला केंद्राने सुरक्षा दिली आहे म्हणून मी वाचलो असं देखील किरीट सोमैया यांनी म्हटलं आहे.
पुण्यासाठी नवा विमानतळ द्यावा; वंदना चव्हाणांची राज्यसभेत मागणी
मी जे काही करतो आहे ते सत्यासाठी आग्रह आहे, परबांनी केलेलं अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे. दोन रिसॅार्ट आहे, एकावरच कारवाई तर दुसऱ्यावर का नाही ?, ठाकरे पोलिसांना नाचवतात, पोलिस जनतेचे आहेत, सगळे माफिया आहे, वसुलीवाले आहेत, असा आरोपही किरीट सोमैयांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
Read also:
- जुन्नर बिबट सफारी प्रकल्प वाद : अजित पवारांनी पुन्हा ठणकावलं
- ” अडाणी आमदार संतोष बांगरला घोडा लावणार “; वचिंतने दिला संतप्त इशारा
- मोठी बातमी : 5 एप्रिलला राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता
- बच्चू कडूंच्या आईच्या तेरविच्या कार्यक्रमात पोलिसानी गायले भजन; प्रचंड व्हायरल
- ” एसटी कर्मचाऱ्यांना आता ३१ मार्चचा शेवटचा अन् अंतिम अल्टिमेटम “; परिवहनमंत्री अनिल परब