मुंबई : उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याची पात्रता असतानाही एका मंत्र्यालाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही हे उत्तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. असं काल विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं. तसेच उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची हुलकावणी देण्यात आली. असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांना देखील उपरोधिक टोला लगावला. याचपार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
” एसटी कर्मचाऱ्यांना आता ३१ मार्चचा शेवटचा अन् अंतिम अल्टिमेटम “; परिवहनमंत्री अनिल परब
उत्तर महाराष्ट्रात स्वर्गीय बळीराम हिरे, रोहिदास पाटील मधूकरराव चौधरी, एकनाथ खडसे यांच्यासारखे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतानाही त्यांना मुख्यमंत्री पद मिळू शकलं नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील त्यानंतर गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल असा उपरोधिक टोला देखील अजित पवारांनी काल विधानसभेत केला.
सतेज पाटीलांसह त्यांच्या कुटुंबिंयाबाबत ईडीकडे तक्रार करणार; कोल्हापूर उत्तरेत राजकारण तापलं
नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव यातील एकालाही ही संधी मिळाली नाही. कोकणात संधी मिळाली, मराठवाड्यात चार, चार मुख्यमंत्री झालेत. विदर्भात चार, चार मुख्यमंत्री झालेत. मात्र एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे हे समजता बरोबर माझी छळवणुक करण्यात आली. माझे दाऊदच्या बायकोबरोबर संबंध जोडण्यात आले. खोटा भुखंड, इडी प्रकरण असे अनेक खोटे आरोप माझ्यावर लावण्यात आले. रश्मी शुक्ला यांच्य माध्यामातून माझा फोन टॅपिंग करण्यात आलं . उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय छळवणुक कधीना कधी भरून निघेल. असा रोष एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर काढला.
“ठाकरेंकडे शक्तिशाली टोमणा बॉम्ब”; फडणवीसांनी उडवली मुख्यमंत्री ठाकरेंची खिल्ली
दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय नेत्यांनी दमदार भाषणं केलीत. यावेळी विधानपरिषेदतील 10 आमदारांना देखील निरोप देण्यात आला. त्यावेळी नेत्यांनी आपली भाषणं केलीत. त्यात एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर धक्कादायक आरोप केलेत.
Read also:
- सोमय्यांचा महाविकास आघाडीवर हातोडा; अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीत
- जुन्नर बिबट सफारी प्रकल्प वाद : अजित पवारांनी पुन्हा ठणकावलं
- ” अडाणी आमदार संतोष बांगरला घोडा लावणार “; वचिंतने दिला संतप्त इशारा
- मोठी बातमी : 5 एप्रिलला राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता
- बच्चू कडूंच्या आईच्या तेरविच्या कार्यक्रमात पोलिसानी गायले भजन; प्रचंड व्हायरल