मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्रात वारंवार सत्ता पालट करण्याची स्वप्ने भाजप बघत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून केला जात आहे.
नितेश,निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित; विनायक राऊतांची खरमरीत टीका
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर आणि ईडीने मोठी कारवाई केल्याचे समोर आले. वारंवार आपल्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याच्या भावनेतून शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेत भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांच्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर आणण्यास सुरुवात केली आहे.
कुणाला कुदळ, फावडा घ्यायचंय ते घ्या, मर्द मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही
यामध्ये पहिली विकेट खऱ्या अर्थाने गेली ती म्हणजे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांची. मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेत मजूर संस्थेतून उमेदवारी अर्ज भरून प्रवीण दरेकर हे अनेक वर्षांपासून निवडून येत होते. मात्र ते कोणत्याही गोष्टीने मजूर असल्याचे सिद्ध नसल्यामुळे आता त्यांच्यावर थेट अटकेची टांगती तलवार आहे.
आयुष्य़ खुप कलाटण्या देतंय; हवं तर विजय चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
यामध्ये त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्जासाठी मागणी केली होती मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आल्याने आता त्यांच्यात चितेंत भर पडली आहे. त्यांना मंगळवार पर्यंत हायकोर्टात जामीन अर्ज करण्यासाठी अद्यापही मुदत आहे मात्र जर त्यांचा जामीन अर्ज हायकोर्टात फेटाळला तर त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई होऊ शकते.
Read also:
- दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
- गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी; आमदार निलेश लंके, राणेंना धो धो धुतलं!
- राजकारणात मंत्र्यांना बायको अडचणीत आणते, नाही तर चहापेक्षा किटली गरम: नितीन गडकरी
- बिचारे अमित शाह खंर बोलतात, त्यांचा आदर वाटतो: सुप्रिया सुळेंची लोकसभेत गुगली
- दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान