सांगली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीएनजी सराफ पेढीच्या 190 व्या वर्धापन दिन निमित्त कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत खुमासदार शैलीत भाष्य केलं. यावेळी त्यांनी सांगितलेल्या जुन्या किस्स्यांनी उपस्थितांमध्ये चांगलाचं हशा पिकला. त्यामुळे राज्यात सध्या नितीन गडकरी यांच्या भाषणांची चर्चा सगळीकडे सुरू आहे.
“वास्तविक पाहता मला राजकारणारपेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता”: देवेंद्र फडणवीस
मी पर्यावरणावादी असून पर्यावरणाच्या विरोधात नाही. मी इंजिनिअर पण आहे पंरतु आर्किटक्टच्या विरोधात नाही. मी चित्रपट समोरून आणि नाटक मागून पाहतो. मी कुणाला ही कधी हार घालत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांनाच फक्त माझ्या पैशातून हार घातला आहेे. जे मत देतील त्याचेही काम करतो आणि मतदान करत नाहीत त्यांचेही काम करतो. कारण मी सगळ्यांचा मंत्री म्हणून काम करत आहे, अंस ते म्हणालेत.
अजित पवारांची ‘ती’ खंत योग्यच; गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया
पुुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात मंत्र्यांना बायको अडचणीत आणते. नाही तर चहापेक्षा किटली गरम असलेला पीए अडचणीत आणतो असं वक्तव्य केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकदमच हशा पिकला, बायकोच्या घरची भिंत बायकोला जेव्हा न सांगता कशी तोडली याचा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला. त्याचबरोबर मी फुकट नाटक कधी बघत नाही. नाट्य़ निर्माते कर्ज काढून नाटक बसवतात. त्यामुळे मी कधीच फुकट नाटक बघत नसल्याचंही ते म्हणालेत.
उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय कधीतरी भरून निघेल; खडसेंचा फडणवीसांवर रोष
दरम्यान, पीएनजी सराफ पेढीच्या 190 व्या वर्धापन दिन निमित्त अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच श्रीकांत जिचकारांना विहिरीत जीव देईन पण पक्ष सोडणार नसल्याचा किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला.
Read also:
- बिचारे अमित शाह खंर बोलतात, त्यांचा आदर वाटतो: सुप्रिया सुळेंची लोकसभेत गुगली
- दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान
- नितेश,निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित; विनायक राऊतांची खरमरीत टीका
- कुणाला कुदळ, फावडा घ्यायचंय ते घ्या, मर्द मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही
- आयुष्य़ खुप कलाटण्या देतंय; हवं तर विजय चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य