अहमदनगर : भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं पेटलं. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आयुष्य़ खुप कलाटण्या देतंय; हवं तर विजय चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपचे निलेश राणे हे आमचं प्रॉडक्ट आह. हिंदू ह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसेत तर राणे पिता-पुत्र कुठेच नसते. सध्या राज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठा दुरूपयोग होत आहे. सत्तेमधील मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या नातेवाईकांवर कारवाया होत आहे. हे चुकीचे असून विरोधकांनी विकासाच्या राजकारणावर बोलले पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशला एकनाथ खडसे यांच्या रूपानेे मुख्यमंत्री मिळाला असता. मात्र खडसे नीट राहिले नाही.त्यामुळे त्यांची संधी हुकली.
“वास्तविक पाहता मला राजकारणारपेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता”: देवेंद्र फडणवीस
यावेळी आमदार निलेश लंके यांच्यावर देखील निशाणा साधला. शिवसेनेने कोरोना काळात सर्वाधिक काम केले. मी देखील कोरोना काळात कोवीड सेंटर चालविले होते. मात्र कधी या कामाची प्रसिद्धी केली नाही. काहींनी सेंटर काढून त्याची वर्तमानपत्रे व टीव्हीमधून प्रसिद्धी केली. माझं बघ माझ बघं म्हणण्याची काहीही गरज नाही. सेवा करायची असेल तर सांगायची नसते. असा चिमचा त्यांनी निलेश लंके यांचा काढला.
अजित पवारांची ‘ती’ खंत योग्यच; गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याची पात्रता असतानाही एका मंत्र्यालाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही हे उत्तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. असं काल विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं. तसेच उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची हुलकावणी देण्यात आली. असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांना देखील उपरोधिक टोला लगावला.
Read also:
- राजकारणात मंत्र्यांना बायको अडचणीत आणते, नाही तर चहापेक्षा किटली गरम: नितीन गडकरी
- बिचारे अमित शाह खंर बोलतात, त्यांचा आदर वाटतो: सुप्रिया सुळेंची लोकसभेत गुगली
- दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान
- नितेश,निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित; विनायक राऊतांची खरमरीत टीका
- कुणाला कुदळ, फावडा घ्यायचंय ते घ्या, मर्द मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही