मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या पाठीमागे किरीट सोमैया हे हात धुवून मागे लागले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांचे दोपोली येथील रिसॉर्ट तोडण्यासाठी भाजपनेते किरीट सोमय्या दोपोलित दाखल झाले आहेत. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलाचं तापलं आहे. यावेळी किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. त्यामुळे दापोली पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
कुणाला कुदळ, फावडा घ्यायचंय ते घ्या, मर्द मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही
दापोलीत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने किरीट सोमय्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. किरीट सोमय्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करीत तरी देखील पोलीस ठाणे गाठले आहे. त्यावर आता पोलिसांकडून सोमय्यांना ताब्यात घेण्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहेत. त्याचबरोबर गृहमंत्री शंभुराज देसाई यांनी किरीट सोमय्यांना इशारा देखील दिला आहे.
आयुष्य़ खुप कलाटण्या देतंय; हवं तर विजय चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
दापोलीत जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर किरीट सोमय्यांवर पोलिस कारवाई करतील असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे. त्यामुळे सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे.
“वास्तविक पाहता मला राजकारणारपेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता”: देवेंद्र फडणवीस
दरम्यान, अनिल परब यांचा रिसॉर्ट हा बेकायदेशीर आहे. मी जो हातोडा घेऊन चाललो आहे हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, मला अटक करुन दाखवा असं खुलं आव्हान किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला केंद्राने सुरक्षा दिली आहे म्हणून मी वाचलो असं देखील किरीट सोमैया यांनी म्हटलं आहे.
Read also:
- गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी; आमदार निलेश लंके, राणेंना धो धो धुतलं!
- राजकारणात मंत्र्यांना बायको अडचणीत आणते, नाही तर चहापेक्षा किटली गरम: नितीन गडकरी
- बिचारे अमित शाह खंर बोलतात, त्यांचा आदर वाटतो: सुप्रिया सुळेंची लोकसभेत गुगली
- दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान
- नितेश,निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित; विनायक राऊतांची खरमरीत टीका