मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाटी काही संघटनांनी संप पुकारला. यामध्ये ज्येष्ठ कामगार नेते र. ग. कर्णिकप्रणित राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघनेशी संलग्न असलेल्या बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ आणि शिक्षकांच्या संघटनांनी लाक्षणिक संपाचा इशारा दिला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी; आमदार निलेश लंके, राणेंना धो धो धुतलं!
जोपर्यंत सार्वजिनिक उपक्रमांना ताकद दिली जात नाही तोपर्यंत रोजगार वाढणार नाही. गेल्या 50 ते 60 वर्षात सर्वाधिक रोजगार सार्वजनिक उपक्रमांनी दिला आहे. सरकारी उद्योग संपवून दोन पाच खासगी उद्योगांना आपल्या मर्जीतल्या लोकांच्या ताब्यात देश द्यायचा. यानं त्यांची संपत्ती वाढेल. पर्यायानं भाजपची संपत्ती वाढेल. हे धोकादायक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी; आमदार निलेश लंके, राणेंना धो धो धुतलं!
जर तुम्ही हिंदूत्त्ववादाचा पुरस्कार करताय. देव, देश आणि धर्म मानता असं म्हणताय तर प्रत्येकानं आपलं वर्तन काय आहे. हे आपण किती खरं बोलतो देवाच्या दरबारात हे तपासुून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात ज्या प्रकराचा खोटेपणाचा कळस उभारला जात आहे. विरोधी पक्षांकडून येथेच्छ बदनामी मोहीम राबवली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात जे राबवलं जातं आहे. या लफंगेगिरीला हिंदूत्त्वात स्थान नसल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं.
बिचारे अमित शाह खंर बोलतात, त्यांचा आदर वाटतो: सुप्रिया सुळेंची लोकसभेत गुगली
दरम्यान, भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांबाबत देखील त्यांनी भाष्य केलं. गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना आवर घालण्यापलीकडं गेेलेली आहे, दोन्ही माणसांबद्दल महाराष्ट्रातील जनतात निर्णय घेईल असंही ते म्हणालेत.
Read also:
- प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मोदींसह अमित शहा, फडणवीस सोहळ्याला उपस्थित
- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण; शिवसैनिकांवर गृहमंत्री कारवाई करणार का?
- बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष पेटला; क्षीरसागरांनी फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते
- मुंबै बॅंक निवडणुक प्रकरण: प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार
- दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा