पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इ. प्रमुख नेत्यांच्या उपस्थित आज प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली. त्यामुळे प्रमोद सावंत हे गोव्याचे दुसऱ्यांदा तर 14 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला.
राजकारणात मंत्र्यांना बायको अडचणीत आणते, नाही तर चहापेक्षा किटली गरम: नितीन गडकरी
प्रमोद सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येकाची कसूून चौकशी करण्यात आली होती. सावंत यांच्यासोबत कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी गोपनियतेची शपथ घेतली.
बिचारे अमित शाह खंर बोलतात, त्यांचा आदर वाटतो: सुप्रिया सुळेंची लोकसभेत गुगली
प्रमोद सांवत यांच्या मंत्रिमंडळात विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहम खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड यांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर आज संध्यापर्यंत सगळ्या मंत्र्यांना खातेवाटप करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी प्रमोद सावंत लवकरच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ विधी कार्यक्रमाची पाहणी केली होती. त्याचबरोबर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे फडणवीसांचे कौतुक सगळ्या स्तरातून केलं जात आहे.
Read also:
- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण; शिवसैनिकांवर गृहमंत्री कारवाई करणार का?
- बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष पेटला; क्षीरसागरांनी फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते
- मुंबै बॅंक निवडणुक प्रकरण: प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार
- दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
- गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी; आमदार निलेश लंके, राणेंना धो धो धुतलं!