जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलणं जळगावमधील एका युवकाला चांगलंच महाग पडलं आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील एका तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिक व महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावात सेंट्रल मॉल परिसरात या तरुणाचा शोध घेऊन त्याला चांगलाच चोप दिला.
बिचारे अमित शाह खंर बोलतात, त्यांचा आदर वाटतो: सुप्रिया सुळेंची लोकसभेत गुगली
हेमंत दुधिया या युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्याचा शोध सुरु केला आणि तो जळगावातील खानदेश सेंट्रल येथे चित्रपट पाहण्यास आला असता त्याला चांगलाच चोप दिला आणि त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले.
दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान
हेमंत दुधियाने सोशल मीडियावर शरद पवार, उद्धव ठकारे, इम्तियाज जलील या तिघांचा एक फोटो एकत्रित केला आणि आक्षेपार्ह मजकूर त्यासोबत टाकला. एवढंच नाही तर या फोटोमध्ये राहुल गांधी यांचा देखील फोटो टाकण्यात आला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेचच शिवसैनिकांनी त्याचा शोध सुरु केला. यानंतर लगेचच शिवसैनिकांनी या तरुणाला केलेल्या मारहाणीचा फोटो समोर आला. यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.
नितेश,निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित; विनायक राऊतांची खरमरीत टीका
या तरूणाला काही जणांनी पहिल्यांदा घेराव घातला आणि त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे . एका महिलेला या गर्दीत झालेली मारहाण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला त्याची पत्नी असल्याची प्राथमिक माहिती आहे. आता या शिवसैनिकांवर काय कारवाई सरकार करणार ? असा प्रश्नही सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे.
Read also:
- बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष पेटला; क्षीरसागरांनी फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते
- मुंबै बॅंक निवडणुक प्रकरण: प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार
- दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
- गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी; आमदार निलेश लंके, राणेंना धो धो धुतलं!
- राजकारणात मंत्र्यांना बायको अडचणीत आणते, नाही तर चहापेक्षा किटली गरम: नितीन गडकरी