मुंबई : द काश्मिर फाईल्स चित्रपटांभोवती फिरणारं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही. यावरून देशातील एव्हाना राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रखरपणे टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काश्मिर फाईल्स चित्रपट बघण्याचं आव्हान लोकांना केलं होतं. आता याचवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्य़क्ष शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य़ केलं आहे.
बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष पेटला; क्षीरसागरांनी फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते
काश्मिर फाईल्स चित्रपटांबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, काही लोकांनी काश्मिर पंडितांवर एक मोहिम चालवली आहे. या चित्रपटातून लोकांची मनं जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील हे पाहिलं गेलं आहे. त्याचबरोबर समाज-समाजामध्ये द्वेष, अंतर कसा वाढेल या प्रकाराची मांडण्या करण्यात आली आहे. असंही ते म्हणालेत.
मुंबै बॅंक निवडणुक प्रकरण: प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार
जेव्हा समाजाता द्वेष वाढवण्याची भूूमिका कोणी मांडत असेल आणि भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल तो चित्रपट अतिशय चांगला आहे, बघितला पाहिजे. अंस जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी ठेवायची कशी हे सगळे प्रश्न उपस्थित होतात, असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला.
दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील काश्मिर फाईल्सवरून केंद्र सरकारवर टिका केली आहे. त्याचबरोबर चित्रपट टॅक्समुक्त करण्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी तो चित्रपट युट्युबवर टाकल्यास सगळे जण बघितील असा सल्ला देखील दिला आहे.
Read also:
- निवडणुकसाठी भाजपचा नवा डाव; भाजप करणार ‘चाय पे चर्चा’
- ‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते; भाजप नेत्याची टीका
- आपण किती खरं बोलतो ते देवाच्या दरबारात तपासून घेतलं पाहिजे :संजय राऊत
- प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मोदींसह अमित शहा, फडणवीस सोहळ्याला उपस्थित
- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण; शिवसैनिकांवर गृहमंत्री कारवाई करणार का?